गोकुळाला वेड लाविले
या मुरलीने कौतुक केले
गोकुळाला वेड लाविले
वेड लाविले श्रीकृष्णाला
हिजविण क्षणही न सुचे त्याला
सतत आपुल्या अधरी धरिले
हिच्या मधुर मंजूळ सुरांतुन
अमरपुरीचे डुलले नंदन
यमुनेचे जळ चाल विसरले
अधरसुधा प्राशून हरीची
पावन झाली तनु मुरलीची
"भाग्यवती मी" मुरली बोले
गोकुळाला वेड लाविले
वेड लाविले श्रीकृष्णाला
हिजविण क्षणही न सुचे त्याला
सतत आपुल्या अधरी धरिले
हिच्या मधुर मंजूळ सुरांतुन
अमरपुरीचे डुलले नंदन
यमुनेचे जळ चाल विसरले
अधरसुधा प्राशून हरीची
पावन झाली तनु मुरलीची
"भाग्यवती मी" मुरली बोले
गीत | - | कवी सुधांशु |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वराविष्कार | - | ∙ माणिक वर्मा ∙ कुमुदिनी पेडणेकर ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, भावगीत |
टीप - • स्वर- माणिक वर्मा, संगीत- दशरथ पुजारी • स्वर- कुमुदिनी पेडणेकर, संगीत- ??? |