गोल तुझ्या शरीराचा डौल
गोल तुझ्या शरीराचा डौल वर गोरा रंग नवती कवळी
वय नूतन हाती निर्या, चालणे चपळगती, नागीण पिवळी
अधरकुटी बत्तीस हिरकण्या एकावळी नग विराजती
ओठ शुद्ध पवळ्याचा रंग, लाजावी पाहून जावेळी ग ती
मंजूळ स्वर ऐकून कोकिळा वृत्ती बसुनी मनी गजबजती
जानु-जंघ सुकुमार पोटर्या अति नाजूक ग कर्दळी

गीत | - | शाहीर होनाजी बाळा |
संगीत | - | वसंत देसाई |
स्वर | - | पंडितराव नगरकर |
चित्रपट | - | अमर भूपाळी |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लावणी |
नवती | - | तारुण्याचा भर. |
Print option will come back soon