A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
वाजवी मुरली श्यामसुंदरा

वाजवी मुरली श्यामसुंदरा
तुझ्या मंदिरी नाचे मीरा!

करि करताळा, पायी घुंगुर
जन्म तुडविते हा क्षणभंगुर
देह नव्हे हा मोरपिसारा!

कसले कलियुग?- मी द्वापारी
गोपवधू मी, तू कंसारी
कालिंदीचा रम्य किनारा

गोपिनाथ तू, मी तर गोपी
पुण्यशील तुज, जगास पापी
आले आले मी अभिसारा!

मिठीत मिटले विश्व मुकुंदा
मी आपणिले ब्रह्मानंदा
तू मी दोघे- अमृतधारा!
गीत- ग. दि. माडगूळकर
संगीत - पुरुषोत्तम सोळांकुरकर
स्वराविष्कार - माणिक वर्मा
आशा भोसले
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
गीत प्रकार - हे श्यामसुंदर भावगीत चित्रगीत
  
टीप -
• स्वर- माणिक वर्मा, संगीत- पुरुषोत्तम सोळांकुरकर.
• स्वर- आशा भोसले, संगीत- सुधीर फडके, चित्रपट- पोस्टातली मुलगी.
अभिसार - ठरविलेल्या जागी (प्रियकराचे) भेटणे किंवा अशी जागा.
करताळ - तळहातात घेऊन वाजवायचे एक वाद्य.
कंसारी - कंसाचा नाश करणारा (कृष्ण).
कालिंदी - यमुना नदी. कालिंद पर्वतातून उगम पावलेल्या यमुना नदीस कालिंदी म्हणूनही संबोधण्यात येते.
द्वापर - चार युगांपैकी तिसरे. (चार युगे- कृत, त्रेता, द्वापर, कली.)

 

  माणिक वर्मा
  आशा भोसले