गोर्यागोर्या टाचंत काटा
आडवाटेनं जाता जाता तोल माझा सुटला
गोर्यागोर्या टाचंत काटा रुतला
(सुया आणा ग बिब्बं आणा ग वाटून लावा झाडाला
हिच्या गोर्या टाचंत काटा रुतला)
सरसरून कळ ही आली
डोळं मिटलं नि बसले खाली
दात रोविता व्हटावरी मी घाम अंगी फुटला
गोर्यागोर्या टाचंत काटा रुतला
(अंगारा लावा कोंबडं कापा घेऊन या ग देवरुषला
हिच्या गोर्या टाचंत काटा रुतला)
कुनी येऊन सावरा मला
काटा काढायची दावा कला
उसासा देता धागा चोळीचा नको तिथं तुटला
गोर्यागोर्या टाचंत काटा रुतला
(काटा बी न्हाई काहीच न्हाई नुसतीच आलिया लाडाला)
नाही माज्या टाचंत काटा रुतला
गोर्यागोर्या टाचंत काटा रुतला
(सुया आणा ग बिब्बं आणा ग वाटून लावा झाडाला
हिच्या गोर्या टाचंत काटा रुतला)
सरसरून कळ ही आली
डोळं मिटलं नि बसले खाली
दात रोविता व्हटावरी मी घाम अंगी फुटला
गोर्यागोर्या टाचंत काटा रुतला
(अंगारा लावा कोंबडं कापा घेऊन या ग देवरुषला
हिच्या गोर्या टाचंत काटा रुतला)
कुनी येऊन सावरा मला
काटा काढायची दावा कला
उसासा देता धागा चोळीचा नको तिथं तुटला
गोर्यागोर्या टाचंत काटा रुतला
(काटा बी न्हाई काहीच न्हाई नुसतीच आलिया लाडाला)
नाही माज्या टाचंत काटा रुतला
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | बाळ पळसुले |
स्वर | - | उषा मंगेशकर |
चित्रपट | - | भिंगरी |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लावणी |
Print option will come back soon