A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गुलजार नार ही

गुलजार नार ही मधुबाला ॥

तनुलतेवर गेंद फुलांचे यौवन ये बहराला ॥

गोड गोड बोलुनी खोडकर ओढ लावि हृदयाला ।
भ्रू-धनुवरती सज्ज करोनी नयनांची शरमाला ।
चंचल नैना सहज विंधिते चंचल हृदयाला ॥
भृकुटी (भ्रू) - भिवई.
लता (लतिका) - वेली.
विंधणे - टोचणे.
शर - बाण.