A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गुरुविण कोण दाखविल

गुरुविण कोण दाखविल वाट
आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर-घाट

दिशा न कळती या अंधारी
नसे आसरा नसे शिदोरी
कंठ दाटला आले भरुनी लोचन काठोकाठ

भुकेजलो मी तहान लागे
पुढे जाऊ की परतू मागे
ये श्रीदत्ता सांभाळी मज, दावी रूप विराट
शिदोरी - अन्य स्थळी जाताना बरोबर घेतलेली अन्‍नाची गाठोडी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.