A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गुरुविण नाही दुजा आधार

गुरुविण नाही दुजा आधार

रडता-पडता कोठे अडता तोच नेतसे पार
गुरुविण नाही दुजा आधार

गुरु परमेश्वर गुरु माउली
सदा कृपेची देई साउली
भक्तांसाठी गुरु होउनी देव घेई अवतार

स्मरण करावे नाम वदावे
वंदन पूजन करिता भावे
प्रसन्‍न होते गुरु माउली सुख दे अपरंपार

शरण तुम्हाला आम्ही प्रभुवर
जगा दिसू द्या तुमचे अंतर
या मायेतून सत्यरूप तव होऊ द्या साकार

 

Print option will come back soon
  अजितकुमार कडकडे, अनुराधा पौडवाल