A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हा असा चंद्र अशी

हा असा चंद्र.. अशी रात फिरायासाठी !
तूच नाहीस इथे हात धरायासाठी !

चेहरा तो न इथे ही न फुलांची वस्ती !
राहिले कोण आता सांग झुरायासाठी?

कालचे तेच फिके रंग नकोसे झाले
दे तुझे ओठ नवा रंग भरायासाठी !

आडवी एक तिथे भिंत मनाची आली..
दार होतेच कुठे आत शिरायासाठी?

काय आगीत कधी आग जळाली होती?
लोक नेतील मला खोल पुरायासाठी !
गीत- सुरेश भट
संगीत - भीमराव पांचाळे
स्वर - भीमराव पांचाळे
अल्बम- दु:खाचे झाले गाणे..
गीत प्रकार - कविता शब्दशारदेचे चांदणे

 

This 👇 player works on all android and iOS devices also
  भीमराव पांचाळे