हा दैवाचा खेळ निराळा
हा दैवाचा खेळ निराळा
नाहि कुणाचा मेळ कुणा !
नशिबाआधी कर्म धावते
दु:ख शेवटी पदराला !
सुखदु:खाच्या सारिपटावर
खेळ खेळतो असाच ईश्वर
या खेळाचे ज्ञान खरोखर
अजुनी न कळे कोणाला
या खेळाचे प्यादे म्हणुनी
सरळ चालिचे मानव निर्मुनि
उंट घोडे भेद ठेवुनी
नियम आखिला खेळाला
दावुनि अपुले हेवेदावे
कुणी कुणाशी का झगडावे?
सारे काही प्रभुला ठावे
मानव ठरतो त्यात खुळा
नाहि कुणाचा मेळ कुणा !
नशिबाआधी कर्म धावते
दु:ख शेवटी पदराला !
सुखदु:खाच्या सारिपटावर
खेळ खेळतो असाच ईश्वर
या खेळाचे ज्ञान खरोखर
अजुनी न कळे कोणाला
या खेळाचे प्यादे म्हणुनी
सरळ चालिचे मानव निर्मुनि
उंट घोडे भेद ठेवुनी
नियम आखिला खेळाला
दावुनि अपुले हेवेदावे
कुणी कुणाशी का झगडावे?
सारे काही प्रभुला ठावे
मानव ठरतो त्यात खुळा
गीत | - | रमेश अणावकर |
संगीत | - | श्रीकांत ठाकरे |
स्वर | - | जयवंत कुलकर्णी |
गीत प्रकार | - | भावगीत |