A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हा मदिर भोवताल

हा मदिर भोवताल स्वप्‍न-भारला
या सुखात धुंद आज होउ दे मला !

लोचनात रिमझिमली वीजपाखरे
स्पर्शातुन जाईचे उमलले तुरे
थरथरत्या गुंजनात जीव गुंतला

शब्दांना ओठांवर मिटुन राहु दे
मौनातच सारे जग विरुन जाउ दे
श्वासांतुन बहरू दे स्वप्‍न-सोहळा
मदिर - धुंद करणारा.