A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हा माझा मार्ग एकला

हा माझा मार्ग एकला !
शिणलो तरीही चालणे मला

दिसले सुख तो लपले फिरुनी
उरले नशिबी झुरणे दुरुनी
बघता बघता खेळ संपला !

सरले रडणे, उरले हसणे
भवती रचितो भलती व्यसने
विझवू बघतो जाळ आतला !

जगतो अजुनी जगणे म्हणुनी
जपतो जखमा हृदयी हसुनी
छळते अजुनी स्वप्‍न ते मला !

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.