A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हांस रे मधु हांस ना

हांस रे मधु हांस ना, खुलवावया मम जीवना
सांग माइया हातुन घडली, काय तुझी वंचना

रिझवु का तुज गाउनी मी, मीलनाची मधुर गाणी
राग लटका सोडुनी झणि, देई रे मज आलिंगना

नूर खुलला नयनी दिसला, भाव नकळत गाली ठसला
अंतरीच्या या निमाल्या सुप्त सगळ्या भावना
गीत - नाना साठे
संगीत - दशरथ पुजारी
स्वर- प्रमोदिनी देसाई
गीत प्रकार - भावगीत
झणी - अविलंब.
निमणे - लय पावणे / मरणे.
वंचना - फसवणूक.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.