हात धरी रे हरी पहा
हात धरी रे हरी पहा पण
करांत माझ्या वाजे कंकण
कुंजवनाच्या मार्गावरती
कमलताटवे नाजुक फुलती
तिथे रमावे तुझ्या संगती
परि पायी हे अडते पैंजण
गोपवधु मी तुळसमंजिरी
एकच आशा असे अंतरी
पावन व्हावे तुझ्या मंदिरी
अबोल झाले हे मृगलोचन
दीप असे तू, मी तर ज्योती
प्रीतरथावर तूच सारथी
पैलतिरावर नेई श्रीपती
परि मेखला करीती किणकिण
करांत माझ्या वाजे कंकण
कुंजवनाच्या मार्गावरती
कमलताटवे नाजुक फुलती
तिथे रमावे तुझ्या संगती
परि पायी हे अडते पैंजण
गोपवधु मी तुळसमंजिरी
एकच आशा असे अंतरी
पावन व्हावे तुझ्या मंदिरी
अबोल झाले हे मृगलोचन
दीप असे तू, मी तर ज्योती
प्रीतरथावर तूच सारथी
पैलतिरावर नेई श्रीपती
परि मेखला करीती किणकिण
गीत | - | मधुकर जोशी |
संगीत | - | वसंत आजगांवकर |
स्वर | - | माणिक वर्मा |
गीत प्रकार | - | भावगीत, हे श्यामसुंदर |
मेखला | - | कमरपट्टा. |
मंजिरी | - | मोहोर, तुरा. |