A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हात दिला ग हाती

हात दिला ग हाती, अवचित भिजल्या श्रावण राती
दोन पाखरे कळ्या-फुलांशी जोडून गेली नाती

सुगंध स्वप्‍नील तुझ्या कुंतला
त्यातून नकळत जीव गुंतला
स्पर्शाच्या हर्षात गारवा तुझा नि माझा साथी

करांत उरली केवळ थरथर
स्वरांत धागे जुळले नवथर
धुंद तराणे छेडीत लहरी दूर तरंगत जाती

वाहत गेला झुळझुळ वारा
स्मृतीत ठेवून मोरपिसारा
प्राजक्ताचा बहर आटवून गंधीत झाली माती
नवथर - नवीन.

 

Random song suggestion
  वसंत आजगांवकर