A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
उघडी नयन शंकरा

उघडी नयन शंकरा, वसंत ये वनांतरी
दर्‍यादर्‍यांत नाचती, गात यक्षकिन्‍नरी

अचल ध्यान हे तुझे मला न आज पाहवे
जीवाशिवात दूरता मला न आज साहवे
ऊठ चंद्रशेखरा करास या धरी करी

पहा प्रसन्‍न पद्मिनी जलाशयात डुंबिती
नील कमलिनीस त्या राजहंस चुंबिती
अधीर आस माझिया थरथरे मनी-उरी
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - यशवंत देव
स्वर- आशा भोसले
गीत प्रकार - भावगीत, नयनांच्या कोंदणी
  
टीप -
• नृत्यनाटिका 'शिवपार्वती' (१९६८) मधील पद.
कमळिणी - कमलिनी. कमळण. कमळाची वेल.
किन्‍नर - उपदेवता, देवलोकींचे गायक.
पद्मिनी - कमळीण, कमळयुक्त तळे / स्‍त्रियांच्या चार जातींपैकी प्रथम आणि सर्वोत्तम जात / स्‍त्रियांचे एक नाव.
यक्ष - उपदेवता, इंद्राचे सेवक.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.