A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हलके हलके चाल राधे

हलके हलके चाल राधे, हलके हलके चाल
राधे घागर डोईला, राधे घागर डोईला

लागू नको ग लागू नको, कान्ह्याच्या नादाला
फुटेल घागर त्या नादाने, काय सांगशिल नवर्‍याला

जाऊ नको ग जाऊ नको, कुंजाच्या वाटेला
वृंदावनीच्या आड वाटा, सामिल मेल्या कान्ह्याला

ऐकू नको ग ऐकू नको, कान्ह्याच्या मुरलीला
या मुरलीवर आजवर त्यानी, कैक भुलविल्या व्रजबाला

विसरू नको ग विसरू नको, प्रीतीच्या संसारा
प्रीतीफुलांचा साज वेच ग, पतिदेवाच्या पूजेला

 

Random song suggestion
  बाबुराव गोखले