A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हळूंच या हो हळूंच या

हळूंच या हो हळूंच या !

गोड सकाळीं ऊन पडे
दंवबिंदूंचे पडति सडे
हिरव्या पानांतुन वरती
येवोनी फुललों जगतीं
हृदयें अमुचीं इवलींशीं
परि गंधांच्या मधिं राशी
हांसुन डोलुन
देतों उधळुन
सुगंध या तो सेवाया
हळूंच या पण हळूंच या !

कधिं पानांच्या आड दडूं
कधिं आणू लटकेंच रडूं
कधिं वार्‍याच्या झोतानें
डोलत बसतों गमतीनें
तर्‍हेतर्‍हेचे रंग किती
अमुच्या या अंगावरती
निर्मल सुंदर
अमुचें अंतर
या आम्हाला भेटाया;
हळूंच या पण हळूंच या !
गीत - कुसुमाग्रज
संगीत - वसंत देसाई
स्वर- वाणी जयराम
गीत प्रकार - बालगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.