हरवले माझे काहीतरी
हरवले माझे काहीतरी
काय हरवले कसे हरवले काहि कळे ना परि
सहज कुणाला दुरुन पाहिले
ओठंगुन मी दूर राहिले
स्पर्शावाचून उगीच उमटला काटा अंगावरी
बघता बघता भुलले डोळे
त्या डोळ्यांतिल भाव निराळे
जागेपणि मज भूल घातली बाई कोणीतरी
लज्जा की ती होती भीती
अजुनी मज ते नसे माहिती
तिथुन परतले परि विसरले तेथे काहितरी
काय हरवले कसे हरवले काहि कळे ना परि
सहज कुणाला दुरुन पाहिले
ओठंगुन मी दूर राहिले
स्पर्शावाचून उगीच उमटला काटा अंगावरी
बघता बघता भुलले डोळे
त्या डोळ्यांतिल भाव निराळे
जागेपणि मज भूल घातली बाई कोणीतरी
लज्जा की ती होती भीती
अजुनी मज ते नसे माहिती
तिथुन परतले परि विसरले तेथे काहितरी
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | वसंत पवार |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | बाळा जो जो रे |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
ओठंगणे | - | टेकणे. |
Print option will come back soon