A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हरी आला ग माझ्या

लुटुलुटु धावत खुदुखुदु हासत
हरी आला ग माझ्या अंगणी

रुणझुणतो वाळा करी लाडिकचाळा
नाचे कान्हा ग माझ्या अंगणी

जाई-जुई फुलली, जिवाची कळीकळी फुलली
बघ चिमण्या अधरी कशी ग बाई धरी चिमणी मुरली
ल्याला गोजिरवाणी नवलाईची लेणी
नंदकिशोर आला अंगणी

बाल मुकुंद गुणी
जणू सखे साजणी, ब्रह्म सानुले उभे अंगणी
सान - लहान.