हवे तुझे दर्शन मजला
हवे तुझे दर्शन मजला, नको गहू ज्वारी
प्रभू तुझ्या दारी आलो होउनी भिकारी
नको देउ पैका अडका, सोनियाचि खाण
माझ्या मुखी तव नामाची पडू नये वाण
घडो तुझी सेवा म्हणुनी आज रामपारी
एकनाथ, तुकया, गोरा, कबीर, सुदाम
जनाबाई, सखु, मीरेच्या मुखी तुझे नाम
तयांपरी झालो वेडा, धांव रे मुरारी
प्रभू तुझ्या दारी आलो होउनी भिकारी
नको देउ पैका अडका, सोनियाचि खाण
माझ्या मुखी तव नामाची पडू नये वाण
घडो तुझी सेवा म्हणुनी आज रामपारी
एकनाथ, तुकया, गोरा, कबीर, सुदाम
जनाबाई, सखु, मीरेच्या मुखी तुझे नाम
तयांपरी झालो वेडा, धांव रे मुरारी
गीत | - | अण्णा जोशी |
संगीत | - | नीळकंठ अभ्यंकर |
स्वर | - | सी. रामचंद्र |
गीत प्रकार | - | भक्तीगीत |
वाण | - | उणीव. |