A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हे आदिमा हे अंतिमा

हे आदिमा, हे अंतिमा
जे वांच्छिले ते तू दिले
कल्पद्रुमा

या मातीचे आकाश तू
शिशिरास या मधुमास तू
देशी मृता तू अमृता
पुरुषोत्तमा

देणे तुझे इतुके शिरी
झालो ऋणी जन्मांतरी
अपकार मी, अपराध मी
परि तू क्षमा
गीत - वसंत निनावे
संगीत - यशवंत देव
स्वर- रामदास कामत
गीत प्रकार - प्रार्थना
आदिम - आरंभीचा / सुरुवातीचा.
कल्पदृम - कल्पवृक्ष, इंद्रलोकांतील काल्पनिक वृक्ष. इच्छित वस्तू देतो अशी समजूत आहे.
वांच्छा - इच्छा.