हे एक रेशमी घरटे
हे एक रेशमी घरटे, जणू स्वप्नांमधले वाटे
एक अनामिक आनंदाची झुळूक इथे झुळझुळते
मायेच्या छायेखाली प्रेमाची नाजुक वेली
प्रेमाची नाजुक वेली मनमौजी झुलते डुलते
ना कधी नजर लागेल, हे सदा फुलत राहील
हे सदा फुलत राहील नंदनवन चौघांपुरते
दिन मावळता घरट्यांत, अधिरा गहिरा एकान्त
कुणी कुणामध्ये विरघळते..
एक अनामिक आनंदाची झुळूक इथे झुळझुळते
मायेच्या छायेखाली प्रेमाची नाजुक वेली
प्रेमाची नाजुक वेली मनमौजी झुलते डुलते
ना कधी नजर लागेल, हे सदा फुलत राहील
हे सदा फुलत राहील नंदनवन चौघांपुरते
दिन मावळता घरट्यांत, अधिरा गहिरा एकान्त
कुणी कुणामध्ये विरघळते..
गीत | - | सुधीर मोघे |
संगीत | - | आनंद मोडक |
स्वर | - | अनुराधा पौडवाल, रवींद्र साठे |
चित्रपट | - | कळत नकळत |
गीत प्रकार | - | चित्रगीत, कल्पनेचा कुंचला |
Print option will come back soon