हें फूल घे तूं साजणे
हें फूल घे तूं साजणे, पण पाकळ्या मोजूं नको;
तूं बोल वेडेवाकडें, पण शब्द ते योजूं नको.
कां योजुनी ही पावलें मीं या दिशेला टाकली?
छे, नांवही नाहीं तिला, तिज नांव तूं देऊ नको.
वार्यावरी दे सोडुनी ते केस तूझे आंधळे;
अन् पाय हे पाण्यांतले मागें असे घेऊ नको.
कोठून आला पक्षि तो, कोठें असावा चालला?
पुसली घराची वाट ती, तिकडे अतां पाहूं नको.
असण्यांत सारी सांगता; असणें इथें, आणी असें;
नि:शब्द नाहीं पांगळें, त्याला पिसें लावूं नको.

| गीत | - | विंदा करंदीकर |
| संगीत | - | यशवंत देव |
| स्वर | - | अरुण दाते |
| गीत प्रकार | - | कविता |
टीप - • काव्य रचना - १९६४. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.

अरुण दाते