A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हे राष्ट्ररूपिणी गंगे

हे राष्ट्ररूपिणी गंगे ! घेईं नमस्कार माझा.

स्वैरपणें पोहावें वाटे तुझिया प्रेमजलीं,
आकुंचितपण बघुनी तुझें हें जीव होइ वर-खालीं.

स्वतंत्रतेची मूर्ति त्रिभुवनिं म्हणुनि तुझी कीर्ति,
परवशतेच्या कांच-कपाटीं काय असावी वसती?

स्वातंत्र्याचें दान कुणा कधिं मागुनि कुणि दिधलें?
याचक वृत्ती सोड सोड ही- कुणीं तुला हें कथिलें?

ध्यानिं आण सामर्थ्य आपुलें स्वयंप्रकाशिनि गंगे !
स्वतंत्रता मिळविण्या समर्था तुझी तूंच अभंगे.
गीत - आनंदराव टेकाडे
संगीत - यशवंत देव
स्वर- आकाशवाणी गायकवृंद
गीत प्रकार - स्फूर्ती गीत, कविता
  
टीप -
• १९२० साली नागपूर येथें भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या प्रथम दिवशी या पदाचे रचियते श्री. आनंदराव टेकाडे यांनी हे सादर केले. ​स्वातंत्र्य हे स्वप्रयत्‍नाने मिळवायचे असते, भीक मागून नव्हे, असे त्यांनी याद्वारे ठासून सांगितले.
संपूर्ण कविता

हे राष्ट्ररूपिणी गंगे ! घेईं नमस्कार माझा.

स्वैरपणें पोहावें वाटे तुझिया प्रेमजलीं,
आकुंचितपण बघुनी तुझें हें जीव होइ वर-खालीं.

स्वतंत्रतेची मूर्ति त्रिभुवनिं म्हणुनि तुझी कीर्ति,
परवशतेच्या कांच-कपाटीं काय असावी वसती?

कठोरतम जो हिमनग जेव्हां तुजसि बंध घाली,
तदुदर फोडुनि तदा रक्षिलिस स्वतंत्रता तूं अपुली.

त्याच तुवां अजि ,मुक्त व्हावया परांस विनवावें,
कर्मगती ही अशी आणखी कुठें शोधण्या जावें?

स्वातंत्र्याचें दान कुणा कधिं मागुनि कुणि दिधलें?
याचक वृत्ती सोड सोड ही- कुणीं तुला हें कथिलें?

ध्यानिं आण सामर्थ्य आपुलें स्वयंप्रकाशिनि गंगे !
स्वतंत्रता मिळविण्या समर्था तुझी तूंच अभंगे.

  संपूर्ण कविता / मूळ रचना

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.