A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हे श्यामसुंदर राजसा

हे श्यामसुंदर राजसा, मनमोहना
विनवुनी सांगते तुज
जाउ दे मला परतुनी!

गाव गोकुळ दूर राहे
दूर यमुनानीर वाहे
हरवले मी कसे मज
चालले कुठे घनवनी?

पावरीचा सूर भिडला
मजसि माझा विसर पडला
नकळता पाउले मम
राहिली इथे थबकुनी!

पानजाळी सळसळे का?
भिवविती रे लाख शंका!
थरथरे, बावरे मन
संगती सखी नच कुणी!
नीर - पाणी.
पावरी - बासरी.