हे तारांगण गूढ गहन
हे तारांगण गूढ गहन आकाश
हा अवकाशाचा खोल निरामय श्वास
हे ॐकाराच्या गाभ्यामधले ऊन
या पुरातनातील काय खरे प्राचीन?
आकाश कुणाचे? पृथ्वी ही कोणाची
जन्मांकित, मरणांकित, यात्रा कोणाची?
हे गूढ पुरातन विश्वचक्र कोणाचे?
जो होईल त्याचा, केवळ त्याचे त्याचे !
हा अवकाशाचा खोल निरामय श्वास
हे ॐकाराच्या गाभ्यामधले ऊन
या पुरातनातील काय खरे प्राचीन?
आकाश कुणाचे? पृथ्वी ही कोणाची
जन्मांकित, मरणांकित, यात्रा कोणाची?
हे गूढ पुरातन विश्वचक्र कोणाचे?
जो होईल त्याचा, केवळ त्याचे त्याचे !
गीत | - | सुधीर मोघे |
संगीत | - | मंगेश गोसावी |
स्वर | - | हृषिकेश रानडे |
अल्बम | - | लय |
गीत प्रकार | - | भावगीत |
निरामय | - | निरोगी / स्वस्थ. |