हेच ते चरण अनंताचे
हेच ते हेच ते हेच ते
हेच ते चरण अनंताचे
ध्यान विषय हे ऋषीमुनींचे संतमहंतांचे
सोनसळ्यांचा हा पीताम्बर
वसन मनोहर पीत कटीवर
उदरभाग हा सुनील सुंदर
आजानु हे असेच दर्शन सपद्महातांचे
सुदीर्घ बाहू विशाल छाती
वैजयंती वर सदैव रुळती
शंख कंठ वर हनु निमुळती
सुहास्य वदना म्हणू काय मी सदन अमृताचे
हीच नासिका हेच सुलोचन
चंद्रसूर्य ज्या नमिती लाजून
हा विष्णू त्रिभुवन जीवन
रूपच आले साकारून मम मनोवांच्छितांचे
हेच ते चरण अनंताचे
ध्यान विषय हे ऋषीमुनींचे संतमहंतांचे
सोनसळ्यांचा हा पीताम्बर
वसन मनोहर पीत कटीवर
उदरभाग हा सुनील सुंदर
आजानु हे असेच दर्शन सपद्महातांचे
सुदीर्घ बाहू विशाल छाती
वैजयंती वर सदैव रुळती
शंख कंठ वर हनु निमुळती
सुहास्य वदना म्हणू काय मी सदन अमृताचे
हीच नासिका हेच सुलोचन
चंद्रसूर्य ज्या नमिती लाजून
हा विष्णू त्रिभुवन जीवन
रूपच आले साकारून मम मनोवांच्छितांचे
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | वसंत देसाई |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | स्वयंवर झाले सीतेचे |
गीत प्रकार | - | राम निरंजन, चित्रगीत |
आजानु | - | गुडघ्यापर्यंत. |
कटि | - | कंबर. |
पद्म | - | कमळ. |
वैजयंती | - | विष्णूच्या गळ्यातली काळी माळ. |
वसन | - | वस्त्र. |
वांच्छा | - | इच्छा. |