A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हे चि येळ देवा

हे चि येळ देवा नका मागें घेऊं ।
तुह्मांविण जाऊं शरण कोणा ॥१॥

नारायणा ये रे पाहुं विचारून ।
तुजविण कोण आहे मज ॥२॥

रात्रंदिन तुज आठवूनि आहें ।
पाहातोसी काये सत्‍व माझें ॥३॥

तुका ह्मणे किती येऊं काकुलती ।
काही माया चित्तीं येऊं द्यावी ॥४॥
रचना-संत तुकाराम
संगीत - वसंत देसाई
स्वर - लता मंगेशकर
गीत प्रकार - संतवाणी