हीच राघवा हीच पैंजणें
हीच राघवा हीच पैंजणें
हीच लेवुनी माझी वहिनी
विहरत होती भयाण रानीं
भूषविली पदकमले ज्यांनी
रुणुझुणू रणुझुणू गाउनि गाणे
वहिनीला मी माता मानुन
सांज-सकाळी करिता वंदन
ज्यांच्यावरती खिळले लोचन
तीच तीच रे ही आभरणे
अलंकार वहिनीचे दुसरे
ठाउक ना मज रघुराया रे
ओळखिली पण पदीची नूपुरे
घडली ज्यांची रोज दर्शने
ज्या चरणास्तव देह वाहिला
त्याविण ठाऊक कांहि न मजला
मुखचंद्र जिचा कधि न पाहिला
कसे ओळखू अन्य दागिने?
हीच लेवुनी माझी वहिनी
विहरत होती भयाण रानीं
भूषविली पदकमले ज्यांनी
रुणुझुणू रणुझुणू गाउनि गाणे
वहिनीला मी माता मानुन
सांज-सकाळी करिता वंदन
ज्यांच्यावरती खिळले लोचन
तीच तीच रे ही आभरणे
अलंकार वहिनीचे दुसरे
ठाउक ना मज रघुराया रे
ओळखिली पण पदीची नूपुरे
घडली ज्यांची रोज दर्शने
ज्या चरणास्तव देह वाहिला
त्याविण ठाऊक कांहि न मजला
मुखचंद्र जिचा कधि न पाहिला
कसे ओळखू अन्य दागिने?
गीत | - | भालचंद्र खांडेकर |
संगीत | - | गजानन वाटवे |
स्वर | - | गजानन वाटवे |
गीत प्रकार | - | भावगीत |
आभरण | - | अलंकार. |