A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ही अशी कोषात अपुल्या

ही अशी कोषात अपुल्या हिंडणारी माणसें
पाप-पुण्यांच्या हिशेबी गुंतणारी माणसें

चेहरें आणि घरें- सारेच शिसवीसारखे
दूर काचेआडुनीही बोलणारी माणसें

शब्द यांचे पांगळे- फिरतात वारें पाहुनी
ही अशी पाहून वारें वागणारी माणसें

चेहर्‍यांची कात यांच्या सांडते वरचेवरीं
ही दुतोंडी, सर्पवंशी, दंशणारी माणसें