निशिगंध तिच्या नजरेचा
निशिगंध तिच्या नजरेचा डोळ्यांत दरवळे माझ्या
चाहूल तिच्या प्रीतीची हृदयात दरवळे माझ्या
आभास सारखा होतो
ती आली.. येत असावी..
झंकार पैंजणांचा त्या, कानांत दरवळे माझ्या
ओठांनी ओठांवरती
मग लिहिली सुंदर गाणी
तो स्पर्श तिच्या श्वासांचा रक्तात दरवळे माझ्या
लाजून बिलगली मजला
हलकेच म्हणाली, 'सजणा'
अंकुर प्रीतीचा आपल्या स्वप्नात दरवळे माझ्या

गीत | - | इलाही जमादार |
संगीत | - | हर्षित अभिराज |
स्वर | - | एस्. पी. बालसुब्रमण्यम |
अल्बम | - | निशिगंध |
गीत प्रकार | - | भावगीत, नयनांच्या कोंदणी |
Print option will come back soon