A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ही दुनिया हाय एक जत्रा

ही दुनिया हाय एक जत्रा, हौसं गवसं नवसं सत्रा
ह्या दुनियेला झुकवत न्हाई त्यो एक येडा भित्रा

नशिबाचा फिरतो पाळणा ही अवघड फेरी
कुणी धरली हातामधी समजंना दोरी
घेरी येऊन वरडंल त्याला जलमाचा बसतोय हादरा

गरिबीचा शिनेमा बघा सोडुनी लाज
सुखासंग दु:खाची ऐका वाजतीया झांज
येडी आशा भावली होऊन उगाच दावतीया नखरा

ह्यो फिरता घोडा नाव त्याचं व्यवहार
कुनी चोर असंल त्यो टांग टाकुनी स्वार
हितंच हाय परि दिसत न्हाई, पोलिस मारतोय चकरा

हे माणुसकीचं हाटेल बघतंय वाट
कुनी तिखाट भेटतोय हितं, कुनी गुळमाट
तुकड्यासाठी लाचार होऊन शेपुट हालवी कुत्रा

ह्या गर्दीमंदी इसर पडतो देवाचा
तोंडानं चालतो गजर नुसत्या नावाचा
काळ्या पैशाची चांदी घेऊन देवळाला मारत्यात पत्रा
गुळमट - गोडसर.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.