ही मावळतीची छाया
ही मावळतीची छाया अन् सूर्यकिरण थकलेले
ओसरून गेले म्हणुनी ढग धूसर धूसर झाले
वारा न वाहतो आता, नि:स्तब्ध जाहली झाडे
क्षितिजाच्या पलिकडली ती मज उघडी दिसती कवाडे
काळोख वाढता येथे, विरघळतील पाऊलवाटा
कुरवाळीत आता बसणे तळव्यातील बाभुळकाटा
ओसरून गेले म्हणुनी ढग धूसर धूसर झाले
वारा न वाहतो आता, नि:स्तब्ध जाहली झाडे
क्षितिजाच्या पलिकडली ती मज उघडी दिसती कवाडे
काळोख वाढता येथे, विरघळतील पाऊलवाटा
कुरवाळीत आता बसणे तळव्यातील बाभुळकाटा
| गीत | - | वसंत कृष्ण वर्हाडपांडे |
| संगीत | - | अभिजीत राणे |
| स्वर | - | सुरेश वाडकर |
| गीत प्रकार | - | कविता |
| कवाड | - | दरवाजाची फळी, दरवाजा. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












सुरेश वाडकर