ही पौर्णिमा हे चांदणें
ही पौर्णिमा, हे चांदणें येईलही पुन्हा
माझेतुझे गाणे परि उमलेल कां पुन्हा?
श्वासांतुनि यात्रा तशी आजन्म झंकारते
केव्हातरीं जन्मांतरीं प्रीती अशी भेटते
जी भेटते केव्हातरीं भेटेल का पुन्हा?
गेलो असे हरवून की ना राहिलो आपुले
दोन्ही मनें एकारली- गाणें नवे जन्मले
जे जन्मते केव्हांतरी जन्मेल का पुन्हा?
माझेतुझे गाणे परि उमलेल कां पुन्हा?
श्वासांतुनि यात्रा तशी आजन्म झंकारते
केव्हातरीं जन्मांतरीं प्रीती अशी भेटते
जी भेटते केव्हातरीं भेटेल का पुन्हा?
गेलो असे हरवून की ना राहिलो आपुले
दोन्ही मनें एकारली- गाणें नवे जन्मले
जे जन्मते केव्हांतरी जन्मेल का पुन्हा?
गीत | - | सुधीर मोघे |
संगीत | - | अनिल-अरुण |
स्वर | - | अरुण दाते |
गीत प्रकार | - | शब्दशारदेचे चांदणे, भावगीत |