सुंदर ते ध्यान
सुंदर तें ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवोनियां ॥१॥
तुळसी हार गळां कांसे पीतांबर ।
आवडे निरंतर तेंचि रूप ॥२॥
मकरकुंडलें तळपती श्रवणीं ।
कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥३॥
तुका ह्मणे माझें हेंचि सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख आवडींने ॥४॥
कर कटावरी ठेवोनियां ॥१॥
तुळसी हार गळां कांसे पीतांबर ।
आवडे निरंतर तेंचि रूप ॥२॥
मकरकुंडलें तळपती श्रवणीं ।
कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥३॥
तुका ह्मणे माझें हेंचि सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख आवडींने ॥४॥
रचना | - | संत तुकाराम |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वराविष्कार | - |
∙
लता मंगेशकर
∙ स्नेहल भाटकर ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
गीत प्रकार | - | संतवाणी , विठ्ठल विठ्ठल |
टीप - • स्वर- लता मंगेशकर, संगीत- श्रीनिवास खळे. • स्वर- स्नेहल भाटकर, संगीत- स्नेहल भाटकर, चित्रपट- तुका झालासे कळस. |
कटि | - | कंबर. |
कांस | - | कंबर. |
कौस्तुभ | - | समुद्रमंथनातून वर आलेल्या चौदा रत्नांतील एक रत्न. |
मकरकुंडल | - | माशाच्या आकाराची कर्णभूषण. |
विराजणे | - | शोभणे. |
श्रवण | - | कान. |
भावार्थ-
- विठ्ठलाचे सुंदर रूप कमरेवर हात ठेवून विटेवर उभे आहे.
- त्याच्या गळ्यात तुळशीचे हार असून कमरेभोवती पीतांबर आहे. विठ्ठलाचे हे रूपच मला नेहमी आवडते.
- त्याच्या कानांत मत्स्याच्या आकाराची कुंडले चमकत आहेत आणि गळ्यात कौस्तुभरत्न शोभत आहे.
- तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठलाचे हे मोहक मुखकमल हेच माझे सर्व सुख आहे. ते मी नेहमी आवडीने पाहीन.
गो. वि. नामजोशी
संत तुकारामाची सार्थ अभंगवाणी
सौजन्य- सुलभ प्रकाशन, मुंबई इतर भावार्थ