A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हिरव्या रंगाचा छंद राया

सजणा, छंद माझा पुरवा
मला हिरव्या पालखीत मिरवा!
हिरव्या रंगाचा छंद राया पुरवा
मला हिरव्या पालखीत मिरवा!

हिरवी साडी हिरवी चोळी
हिरवे गोंदण गोर्‍या गाली
हिरवी तीट कुंकवाखाली
घाला वेणीत हिरवा मरवा!

चढवा हाती हिरवा चुडा
अंगठीत पाचुचा खडा
शेल्यावरी हिरवा चौकडा
हिरवा साज मजला करवा!
गोंदणे - सुईने शरीरावर टोचून नक्षी काढणे.
पाचू (पाच) - एक प्रकारचे रत्‍न.
मरवा - सुगंधी पाने असलेली एक वनस्पती.