सप्त सूर झंकारित बोले
सप्त सूर झंकारित बोले गिरिजेची वीणा
'जय परमेश्वर, गौरीशंकर, जय गौरी-रमणा' ॥
भक्तिरसाची निर्मळ गंगा
वदे खळखळा धवल-तरंगा-
जय गंगाधर ! गिरिजा-रंगा !
जय मंगल-सदना ॥
शंकर-डमरू डम बोले-
शिव-रंजनि ! गिरिबाले !
चरणी तव नत झाले
सुरवर करिती तव भजना ॥
'जय परमेश्वर, गौरीशंकर, जय गौरी-रमणा' ॥
भक्तिरसाची निर्मळ गंगा
वदे खळखळा धवल-तरंगा-
जय गंगाधर ! गिरिजा-रंगा !
जय मंगल-सदना ॥
शंकर-डमरू डम बोले-
शिव-रंजनि ! गिरिबाले !
चरणी तव नत झाले
सुरवर करिती तव भजना ॥
गीत | - | विद्याधर गोखले |
संगीत | - | वसंत देसाई |
स्वर | - | पं. राम मराठे, प्रसाद सावकार, भालचंद्र पेंढारकर |
नाटक | - | जय जय गौरीशंकर |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
टीप - • नांदी. |