A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हो तनय काल महाकाला

हो तनय काल महाकाला; यमवध केला
नाशवंत नरतनुनें, ही सुतलीला ॥

मृत जनक जाई सुतदेहीं, नव गेहीं;
तनुजा तेविं अमर करी स्वकुलाला ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - गंधर्व नाटक मंडळी, हिराबाई बडोदेकर
स्वर- प्रकाश घांग्रेकर
नाटक - विद्याहरण
राग - बिहाग
ताल-त्रिवट
चाल-राजनके राजा महाराजा
गीत प्रकार - नाट्यसंगीत
गेह - घर.
तनुजा - कन्‍या.
तनय - पुत्र. (तनया- पुत्री).
तेवि - त्याप्रमाणे, तसे.
सुत - पुत्र.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.