होम स्वीट होम
होम, स्वीट होम
हॅप्पी-जॉली सारे आनंदाने गा रे
माउली पक्षिणी भरविते घास हा
सानुल्या कोटरी वेगळा भास हा
पंख हे रेशमी, रेशमी पाश हा
मदमत्त झेप घ्यायाचे, सादात 'ओ' द्यायाचे
सूरांत ताल धरती वारे
मी जरी वैभवाला आज झाले पारखी
लाभली निर्धनाला ठेव हाती लाडकी
चित्र हे रंगले देव पाहे कौतुके
सुखाचे राज्य माझे, आनंदी आम्ही राजे
चिलापिलांनो आता या रे
हॅप्पी-जॉली सारे आनंदाने गा रे
माउली पक्षिणी भरविते घास हा
सानुल्या कोटरी वेगळा भास हा
पंख हे रेशमी, रेशमी पाश हा
मदमत्त झेप घ्यायाचे, सादात 'ओ' द्यायाचे
सूरांत ताल धरती वारे
मी जरी वैभवाला आज झाले पारखी
लाभली निर्धनाला ठेव हाती लाडकी
चित्र हे रंगले देव पाहे कौतुके
सुखाचे राज्य माझे, आनंदी आम्ही राजे
चिलापिलांनो आता या रे
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | आशा भोसले, जयवंत कुलकर्णी, मन्ना डे |
चित्रपट | - | जावई विकत घेणे आहे |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
कोटर | - | झाडातली ढोली. |