होशी काय निराश
होशी काय निराश, असा तू होशी काय निराश
पायतळाची अचला धरणी, अचल शिरी आकाश
मार्ग नियोजित हेतु निर्मळ, आडवील तुज किती वावटळ
धूलिकणांतून आरपार बघ येतो सूर्यप्रकाश
कृतनिश्चयी तू पुरुष साहसी, अनुगामिनी मी तुझी प्रेयसी
मी न पाहिला कल्पनेतही माझा नाथ हताश
उचल पुन्हा घे निशाण हाती, मीही येते तुझ्या संगती
तुझ्या हृदयी मी भरून राहिले, व्यथेस ना अवकाश

गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | दत्ता डावजेकर |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | संथ वाहते कृष्णामाई |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
अनुगामन | - | मागे जाणे. |
कृतनिश्चय | - | पक्का निर्धार. |