ह्यो ह्यो ह्यो पाहुणा
ह्यो ह्यो ह्यो पाहुणा, शकुचा मेहुणा
तुझ्याकडे बघुन हसतोय ग
काहीतरी घोटाळा दिसतोय ग
काहीतरी बाई घडलंय खरं
फंदात पाखरू पडलंय खरं
मधावर माशी बसावी जशी
तसाच बिलगून बसतोय ग
प्रेमाचा फासा टाकून असा
आपलासा हा केलास कसा?
नवतीच्या नूरा भुललाय पुरा
जाळ्यात मासा हा फसतोय ग
गुळाला मुंगळा चिटकुन बसं
मेतकुट तुमचं दिसतंय तसं
"होशील का राणी", लागुनी कानी
असंच काहीतरी पुसतोय ग
तुझी नि त्याची तुटावी जोडी
अमृताची विटावी गोडी
म्हणून हा मेला, वामनचा चेला
मोठं मोठं डोळं वासतोय ग
तुझ्याकडे बघुन हसतोय ग
काहीतरी घोटाळा दिसतोय ग
काहीतरी बाई घडलंय खरं
फंदात पाखरू पडलंय खरं
मधावर माशी बसावी जशी
तसाच बिलगून बसतोय ग
प्रेमाचा फासा टाकून असा
आपलासा हा केलास कसा?
नवतीच्या नूरा भुललाय पुरा
जाळ्यात मासा हा फसतोय ग
गुळाला मुंगळा चिटकुन बसं
मेतकुट तुमचं दिसतंय तसं
"होशील का राणी", लागुनी कानी
असंच काहीतरी पुसतोय ग
तुझी नि त्याची तुटावी जोडी
अमृताची विटावी गोडी
म्हणून हा मेला, वामनचा चेला
मोठं मोठं डोळं वासतोय ग
| गीत | - | वामन कर्डक |
| संगीत | - | मधुकर पाठक |
| स्वर | - | श्रावण यशवंते |
| गीत प्रकार | - | लोकगीत |
| नवती | - | तरुणी / तारुण्य / नवी पालवी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












श्रावण यशवंते