A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
इलुसा हा देह

इलुसा हा देह, किती खोल डोह
स्‍नेह प्रेम मोह मांदियाळी मांदियाळी

चेहर्‍यामागचा चेहरा कल्लोळ
आरशात लोळ बिंब जाळी

काय आहे पुण्य? काय आहे पाप?
चंदनाला साप कवटाळी

शून्यातले शून्य जाणीव नेणीव
शून्याची उणीव आली भाळी
गीत - वैभव जोशी
संगीत - अजित परब
स्वर- आनंद भाटे, प्रथमेश लघाटे
चित्रपट - पांघरूण
गीत प्रकार - चित्रगीत
नेणीव - अज्ञान.
मांदियाळी - समुदाय.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.