जा रे चंद्रा क्षणभर जा
जा रे चंद्रा क्षणभर जा ना मेघांच्या पडद्यात
नवखी माझी राधाराणी लाजे येथ मनात
पहिलीवहिली गोड भेट ही
मनात काहूर असेच काही
फुलावयाचे इथे फूल रे नव्याच उन्मादात
वाट पाहते तुझी रोहिणी
मोह कुणाचा इथला अजुनी
शिकायची का शृंगाराची अमुची नाजुक रीत
पुरे अता ना छळणूक असली
तुझ्या प्रकाशी रति रुसली
तिच्या मनाचे गुज ऐकू दे मजला अंधारात
उद्या रात्रीला पुन्हाच ये पण
आज रात्रीची तेव्हा सांगीन
मधुराणीची गोड कहाणी तुलाच एकान्तात
नवखी माझी राधाराणी लाजे येथ मनात
पहिलीवहिली गोड भेट ही
मनात काहूर असेच काही
फुलावयाचे इथे फूल रे नव्याच उन्मादात
वाट पाहते तुझी रोहिणी
मोह कुणाचा इथला अजुनी
शिकायची का शृंगाराची अमुची नाजुक रीत
पुरे अता ना छळणूक असली
तुझ्या प्रकाशी रति रुसली
तिच्या मनाचे गुज ऐकू दे मजला अंधारात
उद्या रात्रीला पुन्हाच ये पण
आज रात्रीची तेव्हा सांगीन
मधुराणीची गोड कहाणी तुलाच एकान्तात
गीत | - | पुरुषोत्तम पाटील |
संगीत | - | बबनराव नावडीकर |
स्वर | - | बबनराव नावडीकर |
गीत प्रकार | - | शब्दशारदेचे चांदणे, भावगीत |
गुज | - | गुप्त गोष्ट, कानगोष्ट. |