A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कुणी काही म्हणा

कुणी काही म्हणा, कुणी काही म्हणा
अनुसरले मी अपुल्याच मना

रीत म्हणा, विपरीत म्हणा
दिले झुगारुनि आवरणा

रीति-कुरीति, नीति-अनीति
आता उरली चाड कुणा?
लोकलाज-भय धरु कशाला
मागायाचे काय जनां?

जळल्या सार्‍या आशा मनिंच्या
पुसल्या उरल्या त्याहि खुणा
जीव भरेना, हौस पुरेना
वाढतोच घरिं काम दुणा
यास्तव हा परपुरुष परिणिला
मन मिनले गोविंदगुणां
चाड - शरम.
मिनणे - एकत्र होणे / प्राप्‍त होणे.

 

Print option will come back soon