जा सांग लक्ष्मणा
जा सांग लक्ष्मणा, सांग रामराजाला
"समजला" म्हणावे, न्याय तुझा सीतेला
"अग्नीत घेतली उडी, उजळली कुडी
पटविले तेव्हा, होतास तिथे तू देवा
केलास न्याय परि उलटा, ठरले कुलटा
केलीस सफळ मम सेवा
शोभले तुझ्या वंशास, दिगंत यशास चढेल तजेला"
जा सांग "जानकी अजुनी राही जिवंत
जो रघुवंशाचा अंश तिच्या उदरात
तोवरी प्राण कोंडिल देहकोषात
राणीची भिकारीण आज होय, रघुराज तिला सांभाळा"
"समजला" म्हणावे, न्याय तुझा सीतेला
"अग्नीत घेतली उडी, उजळली कुडी
पटविले तेव्हा, होतास तिथे तू देवा
केलास न्याय परि उलटा, ठरले कुलटा
केलीस सफळ मम सेवा
शोभले तुझ्या वंशास, दिगंत यशास चढेल तजेला"
जा सांग "जानकी अजुनी राही जिवंत
जो रघुवंशाचा अंश तिच्या उदरात
तोवरी प्राण कोंडिल देहकोषात
राणीची भिकारीण आज होय, रघुराज तिला सांभाळा"
गीत | - | वसंत बापट |
संगीत | - | जी. एन्. जोशी |
स्वर | - | गीता दत्त |
गीत प्रकार | - | राम निरंजन, भावगीत |