जाण आहे आपणांसी
जाण आहे आपणांसी, मी कशाला सांगणे
कठिण झाले प्राणनाथा एकट्याने राहणे
दिवस जातो सहज सरुनी, रात्र बसते रोवुनी
पेटती हट्टास डोळे नाव तुमचे घेउनी
चहू दिशांना एक दिसते रूप उमदे देखणे
नेटका संसार माझा नांदते मी गोकुळी
दु:ख आहे एक हे की राव नाही राउळी
फुलून सुकती भाव माझे ते कुणाला वाहणे
कठिण झाले प्राणनाथा एकट्याने राहणे
दिवस जातो सहज सरुनी, रात्र बसते रोवुनी
पेटती हट्टास डोळे नाव तुमचे घेउनी
चहू दिशांना एक दिसते रूप उमदे देखणे
नेटका संसार माझा नांदते मी गोकुळी
दु:ख आहे एक हे की राव नाही राउळी
फुलून सुकती भाव माझे ते कुणाला वाहणे
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | वसंत देसाई |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | छोटा जवान |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
राऊळ | - | देऊळ. |