A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जाण जरि शत्रुला जामात

जाण जरि शत्रुला, जामात नेमिला ।
वंशतरू जाळिला, मींच माझा ॥

देवयानी मला, पुत्र जणुं एकला ।
काव्यरस जन्मला, गीतराजा ॥

अभिमान हा दिसे, तापसाला पिसें ।
जीव परि तो असे, आप्तकाजा ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - गंधर्व नाटक मंडळी, हिराबाई बडोदेकर
स्वर-
नाटक - विद्याहरण
राग - शंकरा
ताल-झपताल
चाल-निर्धना जी वरी
गीत प्रकार - नाट्यसंगीत
  
टीप -
• या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल.
काज - काम.
जामात - जावई.
पिसे - वेड.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.