A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जाग रे यादवा

जाग रे यादवा
कृष्ण गोपालका
फिकटल्या तारका, रात सरली

पक्षिगण जागले
किलबिलू लागले
अजून का लोचनी नीज उरली?

उमलला फुलवरा
गंध ये मोहरा
मंद यमुनाजळी झुळुक शिरली

उठुन गोपांगना
करिती गोदोहना
हरघरी जणू सुधाधार झरली

निवळल्या दशदिशा
अंबरी ये उषा
सोनियाने तिची मूठ भरली
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - राम कदम
स्वर- सुमन कल्याणपूर
चित्रपट - प्रेम आंधळं असतं
राग / आधार राग - पहाडी
गीत प्रकार - चित्रगीत, हे श्यामसुंदर
उषा - पहाट.
दोहने - दूध काढणे.
सुधा - अमृत / सरळ, योग्य मार्गाने जाणारा.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.