जगणे अमुचे नका विचारू
कधी आम्ही गार सावली चाखितो, कधी उन्हाच्या चटकीं
जगणे अमुचे नका विचारू आम्ही पाखरें भटकी
बालपणीं बल करांत नव्हते
निराधार ते जीवन होते
जोवर होती आई चोचिण्या कण्या-बाजरी-मटकी
पंख पसरिता उडण्यापुरते
मग घरट्यातिल जीवन सरते
चिवचिव करिता कोण ऐकतो साद आमुची लटकी?
पुरे जाहले जातो आता
शोधित फिरतो अपुला दाता
वेळेवर धावेल आमुच्या संकटाचिया घटकीं
जगणे अमुचे नका विचारू आम्ही पाखरें भटकी
बालपणीं बल करांत नव्हते
निराधार ते जीवन होते
जोवर होती आई चोचिण्या कण्या-बाजरी-मटकी
पंख पसरिता उडण्यापुरते
मग घरट्यातिल जीवन सरते
चिवचिव करिता कोण ऐकतो साद आमुची लटकी?
पुरे जाहले जातो आता
शोधित फिरतो अपुला दाता
वेळेवर धावेल आमुच्या संकटाचिया घटकीं
गीत | - | अण्णा जोशी |
संगीत | - | अण्णा जोशी |
स्वर | - | राणी वर्मा |
गीत प्रकार | - | भावगीत |
Print option will come back soon