A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जागे व्हा मुनिराज

जागे व्हा मुनिराज, वनी या
जपतप हे सारे वाया

सोडा ही प्रियकरा साधना
स्वीकारा ही प्रियाराधना
सोडुनी द्या तरूची छाया

आले मी प्रियसखी मेनका
इंद्राघरची परी, नर्तिका
वलयांकित माझी काया

पदयुगुलांच्या झंकाराची
सप्तरंगी या सात सुरांची
पसरीन मी भवती माया
गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - प्रभाकर जोग
स्वर- आशा भोसले
चित्रपट - दाम करी काम
गीत प्रकार - चित्रगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.